आई भवानी तुझ्या कृपेने

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माउली मारी संकटाला
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये

गोंधळा मांडला भवानी गोंधळा ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये
गोंधळा मांडला गोंधळा भवानी ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये

उधव उधव उधव उधव उधव उधव
उधव
गळ्यात घालूनी कावळ्याची माल पायात बांधली चला
हातात आरडे तुलागा आवड वाजवितो सांबाला

ढग ढगात्या ज्वालेतून आली तुच जगत्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी
गोंधळा मांडला भवानी गोंधळा ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये
गोंधळा मांडला गोंधळा भवानी ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये

चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा
हात जोडूनी करून मागतो उद्धार कर गावाचा

अधर्म निर्दानुनी धर्म हा , आई तूच रक्षिला
महिषासुरमर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी , धावत ये लवकरी
आज आम्हावरी संकट भारी , धावत ये लवकरी
आंबे गोंधळाला ये


गोंधळा मांडला भवानी गोंधळा ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये
गोंधळा मांडला गोंधळा भवानी ये
गोंधळा मांडला गोंधळा आंबे ये

0 comments:

Post a Comment